निसर्ग हा मानवाला मिळालेले एक वरदान आहे आणि त्यात झाडे हि त्या निसर्गाने दिलेले वरदान आहे . अशावेळी आपण ज्या वेळी या झाडाकडे पाहतो त्या वेळी याच्या उपकाराची जाणीव होते व मनाच्या एका कोपऱ्यातून या मनुष्यमित्रा विषयी त्याचे गुण गाणारे एक काव्य निघते ...
झाड ...
झाडाला घरटे जसे दागिने सोन्याचे
पक्षी किलबिले त्यात लागे गाणे ते मोलाचे
ऋतु लागे कि जणू सण त्या झाडाचा
कधी ऊन खूप लागे कधी वारा वाहे सोसाट्याचा
त्या झाडाची सावली लागे पदर मायेचा
किती मोह लागे त्याच्या त्या सावळ्या कुशीचा
मोत्याहूनी मौल्यवान लागे पाने,फुले त्याची
देई गोर-गरीबाला कशी भाकर सुखाची
डोईवर घेई रोज कशी चादर सोन्याची
पहाटेचा तो काळ जणू ती वाट स्वर्गाची
-भूषण तिडके
डोईवर घेई रोज कशी चादर सोन्याची
पहाटेचा तो काळ जणू ती वाट स्वर्गाची
-भूषण तिडके
